Subscribe Us

Header Ads

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच-२ मराठी साहित्य

  प्र.1. "श्रीमान योगी" हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

उत्तर :- छ. शिवाजी महाराज

 

प्र.2. "माझे विद्यापीठ" हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे?

उत्तर :- नारायण सुर्वे

प्र.3. "झोंबी" हे आत्मचरित्र कोणत्या लेखकाचे आहे?

उत्तर :- आनंद यादव

 

प्र.4. उत्तमराव कांबळे यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे?

उत्तर :- वाट तुडवतांना

प्र.5. मराठी गझलकार म्हणून कोणाचं नाव आदराने घेतलं जातं?

उत्तर :- सुरेश भट

 

प्र.6. 'बालकवी' यांचं पूर्ण नाव काय?

उत्तर :- त्र्यंबक बापूजी ठोंबरे

 

प्र.7. इंद्रजित भालेराव यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता?

उत्तर :- पीक पाणी 

 

प्र.8. "कणा" ही सुप्रसिद्ध कविता कोणत्या कवीची आहे,?

उत्तर :- कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)

 

प्र.9. कवित्री बहिणाबाई चौधरी यांचं जळगाव जिल्ह्यातील गावाचं नाव काय?

उत्तर :- आसोदा

 

प्र.10. पांडुरंग सांगवीकर हे कोणत्या कादंबरीच्या नायकाचं नाव आहे?

उत्तर :- कोसला 

प्र.11. 'केशवसुत' यांचे पूर्ण नाव काय?

उत्तर :- कृष्णाजी केशव दामले

 

प्र.12. "तंट्या" ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

उत्तर :- तंट्या भिल्ल 

 

प्र.13. "पानिपत" ही कोणत्या प्रकारची कादंबरी आहे?

उत्तर :- ऐतिहासिक कादंबरी

 

प्र.14. "तहान" ही कादंबरी कोणत्या प्रकारच्या साहित्यात मोडते?

उत्तर :- ग्रामीण साहित्य

 

प्र.15. "विकारविलसित" या नाटकाचे लेखक कोण ?

उत्तर :- कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर)

 

प्र.16. मराठीतील रानकवी म्हणून कोणाची ओळख आहे?

उत्तर :- ना. धो. महानोर 

 

प्र.17. वि. वा. शिरवाडकर यांच्यावर जास्त करून कोणत्या इंग्रजी नाटक कार्याचा प्रभाव दिसून येतो?

उत्तर :- विल्यम शेक्सपियर

 

प्र.18. "कामगार आहे मी, तळपती तलवार आहे" या काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहेत?

उत्तर :- नारायण सुर्वे

 

 प्र.19. "चिंब पावसाने रान झालं आबादानी" या गीताचे रचनाकार कोण आहेत?

उत्तर :- ना. धो. महानोर

 

प्र.20. "फकीरा" ही सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- अण्णाभाऊ साठे

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या