◆ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.
◆ कार्यकाल तीन वर्षासाठी असणार आहे. यापूर्वी विजया रहाटकर या पदावर कार्यरत होत्या.
◆ राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली.
◆ आयोगाच्या सचिव :- अनिता पाटील
◆ राज्याच्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विशेषतः संविधानाच्या कलम 38, 39 अ, 42 करिता राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर 1993 साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
◆ आयोग हा वैधानिक संस्था असून तिला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे.
◆ आयोग महिलांना मोफत कायदेविषयक सेवा पुरवतो.
◆ महिलांच्या प्रश्नांबात संशोधन करणे, जनजागृती मोहीमा राबवणे असे इत्यादी कामे करतात.
0 टिप्पण्या
कृपया, काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर Comment Box मध्ये टाकाव्यात. कृपया, फालतू कमेंट्स करू नये.